November 2022

पुणे : शॉर्टहँड आणि विद्यापीठाच्या परीक्षा एकत्र आल्याने विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला होता परंतु जागृत संघटनांनी आवाज उठून अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केल्याने रद्द झालेल्या परीक्षा पुन्हा घेण्यात आल्याने संघटनेच्या या लढ्यास यश आले आहे.


महाराष्ट्र परीक्षा परिषदेच्या संगणक, लघुलेखन आणि टायपिंगच्या परीक्षा होत असतात,
मात्र जुलै २०२२मध्ये झालेल्या शॉर्टहॅण्ड परीक्षेच्या वेळी विद्यार्थ्यांच्या विद्यापीठ परीक्षा सुध्दा आल्या होत्या. लॉकडाऊन पासून बरेच विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरसाठी नोकरीसाठी अत्यावश्यक असलेल्या लघुलेखन परीक्षांबाबत अनियमितता आली होती. दोन वर्षे अभ्यास, सराव व वेळ देऊन पुन्हा शॉटहॅण्ड परीक्षेला विद्यार्थी बसू शकणार नाही की काय आणि पुन्हा नोकरीच्या वाटा बंद होतील की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती.
महाराष्ट्रातील काही जिल्ह्यातील जिल्ह्यातील शॉर्टहँड आणि विद्यापीठाच्या परीक्षा एकत्र आल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय झाली होती याबाबत कोल्हापूरच्या अभिलाषा नाईक, पुण्याचे हेमंत ढमढेरे यांनी टायपिंग संघटनेच्या माध्यमातून परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून हा मुद्दा प्रकर्षाने मांडला होता, परीक्षा मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी आणि इतर अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत परीक्षा पुन्हा घेण्याचे आश्वासन दिले होते,
त्यानुसार महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त शॉर्टहँड परीक्षा घेण्यात आल्याने विविध जिल्ह्यातून आलेल्या विद्यार्थ्यांनी अभिलाशा नाईक, हेमंत ढमढेरे व परीक्षा परिषदेचे अध्यक्ष शरद गोसावी यांच्या आभार मानले.

 शॉर्टहँड आणि विद्यापीठाच्या परीक्षा एकत्र आल्याने अनेक विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होणार होते त्यांनी खूप दिवस परिश्रम घेतले असताना परीक्षास मुकावे लागत होते परंतु संघटनेच्या माध्यमातून अभिलाषा नाईक व आम्ही पाठपुरावा केल्याने परीक्षा परिषदेचे अध्यक्ष शरद गोसावी यांच्या आदेशानुसार पुन्हा परीक्षा घेण्यात आल्याने विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान टळले आहे अशी माहिती हेमंत ढमढेरे यांनी यावेळी दिली.

 यावेळी अभिलाषा नाईक व हेमंत ढमढेरे तसेच परीक्षा परिषदेचे अध्यक्ष शरद गोसावी यांच्यामुळे आमच्या परीक्षा पुन्हा झाल्या त्यामुळे आमचे मोठे नुकसान टळले आहे, त्याबद्दल या सर्व अधिकाऱ्यांच्या आभार असे प्रतिक्रिया विविध जिल्ह्यातून आलेल्या विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. यावेळी महात्मा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विद्यार्थ्यांना पेढे वाटप करण्यात आले.


पुणे : मुंबई-बेंगलुरु हाईवे पर नावले पुल इलाके में हादसों का सिलसिला जारी है और बुधवार सुबह 5 बजे के आसपास एक पिकअप वाहन चालक का वाहन पर से नियंत्रण खो जाने के बाद हाईवे पर पलट गया। इसमें कुल 8 यात्री सवार थे। इनमें से 7 घायल हो गए हैं। हादसा नर्हे नावले पुल के पास स्थित भुमकर पुल के पास हुआ।

 


घटना की जानकारी मिलते ही सिंहगढ़ रोड पुलिस व हाईवे पेट्रोलिंग के अधिकारी व कर्मचारी मौके पर पहुंचे और क्रेन की मदद से दुर्घटनाग्रस्त वाहन को हटवाया। पिकअप चालक ने कहा कि मेरी गाड़ी को पीछे से एक ट्रक ने टक्कर मार दी, जिससे हमारी गाड़ी पलट गई। पिछले सप्ताह सात दिनों में इस इलाके में आठ हादसे हो चुके हैं। लगातार हो रहे हादसों से नागरिकों में राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण के खिलाफ आक्रोश देखा जा रहा है। इस संबंध में स्थानीय लोगों द्वारा राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण की ओर से ठोस कदम उठाने की मांग की जा रही है।

Entertainment News - काही कलाकार आपल्या उपस्थितीनं वातावरणात नवचैतन्य निर्माण करतात, पण काही अनुपस्थितीतही आपली उणीव भासू देत नाहीत. ते गेले तरी त्यांचं काम कायम बोलत रहातं. असाच काहीसा अनुभव सध्या मनोरंजन विश्व घेत आहे. ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी मनाला चटका लावणारी एक्झीट घेतली आणि संपूर्ण सिनेसृष्टी हळहळली. विक्रम गोखले यांनी जरी इहलोकीची यात्रा संपवली असली तरी चित्रपटरूपात ते कायम रसिकांसोबत राहणार आहेत. याच शोकाकूल वातावरणात सिनेरसिकांना दिलासा देणारी बातमी म्हणजे त्यांनी अभिनय केलेला 'सूर लागू दे' हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. नुकतंच या चित्रपटाचं पहिलं पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. सोशल मीडियावर 'सूर लागू दे'च्या पोस्टरला नेटकऱ्यांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे.



निर्माते अभिषेक 'किंग' कुमार आणि नितीन उपाध्याय यांनी आॅडबॅाल मोशन पिक्चर्सच्या बॅनरखाली 'सूर लागू दे' या चित्रपटाची निर्मिती केली आहे. प्रवीण विजया एकनाथ बिरजे यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. पिकल एंटरटेन्मेंटचे समीर दीक्षित आणि ऋषिकेश भिरंगी या चित्रपटाच्या वितरणाचं काम पाहत आहेत. 'सूर लागू दे' या चित्रपटाच्या शीर्षकातच संगीताचा ताल दडलेला आहे. त्यानुसार या चित्रपटाचं कथानकही काहीशा वेगळ्या पठडीतील आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते विक्रम गोखले आणि सुहासिनी मुळये हे दोन दिग्गज कलाकार 'सूर लागू दे'मध्ये मुख्य भूमिकेत आहेत. या निमित्तानं विक्रम गोखले आणि सुहासिनी मुळ्ये बऱ्याच दिवसांनी एकत्र काम करताना दिसणार आहेत. या चित्रपटात सुप्रसिद्ध मराठी टीव्ही अभिनेत्री रीना अगरवालही महत्त्वपूर्ण भूमिकेत असून इतरही मातब्बर कलावंतांची फळी यात असल्यानं अभिनयाची जणू जुगलबंदीच रंगलेली पहायला मिळणार आहे. विक्रम गोखले यांनी नेहमी संवेदनशील, सामाजिक आशयावर आधारलेले, वर्तमान काळाशी निगडित असलेलल्या आणि नाविन्यपूर्ण विषयावर आधारलेल्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. 'सूर लागू दे' हा चित्रपट त्यांची परंपरा पुढे सुरू ठेवणारा असून त्यांच्या पश्चातही त्यांचं  काम आणखी प्राभावीपणे सादर करणारा ठरेल. या चित्रपटाची कथा अशा लोकांवर आधारलेली आहे ज्यांच्यासाठी विक्रम गोखले कायम उभे राहिले.




सामाजिक जाणीवेचं भान राखून लिहिलेलं प्रेरणादायी कथानक या चित्रपटाचं मुख्य वैशिष्ट्य आहे. मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधनाचा वारसा जपत 'सूर लागू दे' फुल टू मनोरंजन करणार आहे. यात नात्यांची गोष्टही आहे. याबाबत दिग्दर्शक प्रवीण म्हणाले की, 'सूर लागू दे' या चित्रपटाची कथा कुठेही घडू शकणारी आहे. आयुष्याच्या संध्याकाळी एक व्यक्ती कशाप्रकारे संघर्ष करत इतरांसाठी प्रेरणादायी कार्य करतो ते यात पहायला मिळेल. यात मुख्य भूमिका साकारणाऱ्या विक्रम गोखले यांच्या पश्चात 'सूर लागू दे' हा चित्रपट प्रदर्शित करताना संपूर्ण टिमला खूप दु:ख होत आहे. त्यांच्या जाण्यानं मनोरंजन विश्वाचं कधीही न भरून निघणारं नुकसान झालं आहे, पण 'सूर लागू दे' या चित्रपटाच्या रूपात जाता-जाता त्यांनी आपल्या चाहत्यांना एक अनमोल मेसेज दिला आहे. त्यामुळे त्यांना समर्पित भावनेनं आम्ही हा चित्रपट रसिकांसमोर आणत आहोत. रसिक त्याला उत्तम दाद देऊन आपल्या लाडक्या कलाकाराला अभिवादन करतील यात शंका नाही. 'सूर लागू दे' या चित्रपटाचं लेखन आशिष देव यांनी केलं असून, संगीत पंकज पडघन यांनी दिलं आहे. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

"पुण्याच्या निकिता टकले-खडसरेने पटकाविल्या चार ट्रॉफी"

पुणे : इंडियन नॅशनल ऑटोक्रॉस चॅम्पियनशिप  2022 वेस्ट झोन क्वालिफाईड राऊंड पुणे नानोली येथे पार पडला, या रॅलीमध्ये फास्टर ड्रायव्हर सह चार ट्रॉफी मिळविण्यात पुण्याच्या निकिता टकले खडसरेला यश आले आहे, कार नादुरुस्त होऊनही जिद्दीने स्पर्धेत यश मिळविल्याने निकिताचे अभिनंदन होत आहे. 


 26 व 27 नोव्हेंबर रोजी पुण्यातील नानोली गावामध्ये दोन दिवसीय इंडियन नॅशनल ऑटोक्रॉस चॅम्पियनशिप आयोजित करण्यात आली होती या या स्पर्धेमध्ये भारताच्या वेस्ट झोन व बेंगलोर, हैदराबादसह 50 ते 60 कार रायडर सहभागी झाले होते या स्पर्धेत अतिशय निष्णात अनुभवी ड्रायव्हर सहभागी असताना नवख्या निकिता टकले खडसरेने पहिल्याच दिवशी फास्टर ड्रायव्हर या गटात पहिली ट्रॉफी पटकावली या ट्रॉफीसह विविध राउंड मध्ये आणखी तीन ट्रॉफी मिळविल्याने तिचे कौतुक होत आहे.



 एफएमएससीआय च्या आयोजकांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके वितरीत करण्यात आली. दुसरा दिवस मात्र निकितासाठी खूप खडतर होता कारण पहिल्या दिवशीच्या राऊंडनंतर गाडी बंद पडल्याने व स्पर्धा खेडेगावात असल्याने त्या ठिकाणी गाडीचे पार्ट व मेकॅनिक उपलब्ध न झाल्याने स्पर्धेत पुन्हा सहभागी होण्याबाबत संभ्रम निर्माण झाला होता परंतु नाउमेद न होता इतर गाड्यांचे पार्ट टाकून कार सुरू केली परंतु गाडी दुरुस्त झाली नाही तरी पुन्हा सहभागी होत निकिताने एक ट्रॉफी पटकावली. पहिल्या दिवशी फास्टर ड्रायव्हरसह तीन ट्रॉफी पटकविल्या. निकिताच्या या यशाचे श्रेय ती वडील उद्योजक नितीन टकले, पती शुभम खडसरे, कुटुंबीय व तिचे मार्गदर्शक चेतन शिवराम यांना देते.


 दोन ते पाच डिसेंबर रोजी इंडियन नॅशनल  चॅम्पियनशिप (के 1000) आयोजित केली आहे यामध्ये निकिता टकले सहभागी होणार आहे या स्पर्धेत सहभागी होऊन पहिली ट्रॉफी जिंकण्याचा मानस तिने बोलताना व्यक्त केला.
 राष्ट्रीय स्तरावर सहभागी होत यश मिळवीत असताना मुख्य लक्ष जागतिक स्तरावरील मोटर रॅलीमध्ये (डब्ल्यू.आर. सी.) मध्ये सहभागी होऊन भारताचे नाव जगाच्या नकाशात कोरण्याचा संकल्प निकिता टकलेने प्रसिद्धिमाध्यमांशी बोलताना व्यक्त केला.


"खेडेगावात स्पर्धा, कार नादुरुस्त, जिद्द मात्र कायम..

 
पुण्यातील नानोली मध्ये दोन दिवसीय चॅम्पियनशिप पार पडली, ग्रामीण भाग त्यात पहिला राउंड झाल्यावर निकिताच्या कारने धोका दिला, आणि गाडी बंद पडली, गाडीचे पार्ट मिळेना आणि निष्णात मेकॅनिक  उपलब्ध नव्हता, परंतु जिद्द न सोडता दुसऱ्या गाडीचे पार्ट लावून पुन्हा सहभागी होऊन कार व्यवस्थित चालत नसतानाही एक ट्रॉफी निकिताने मिळवली. तिच्या जिद्दीचे सर्वत्र कौतुक झाले.

पुणे: पुणे से कराड के बीच सोमवार रात को  गाड़ी संख्या 17318 लोकमान्य तिलक टर्मिनस - हुबली एक्सप्रेस में यात्रियों से वसूली करते हुए एक फ़र्जी टीटी को पकड़ा गया है I मिरज के टिकट निरीक्षक वाय. के. वैष्णव, बी. एम. शेख तथा पी. एस. घाड़गे की सतर्कता एवं सूझबूझ के चलते इस व्यक्ति को  पुलिस के हवाले कर दिया गया ।  


 

           गाड़ी के पुणे स्टेशन से रवाना होने पर गाड़ी में ड्युटी पर तैनात टिकट निरीक्षक वाय. के. वैष्णव को कुछ यात्रियों ने बताया कि कोच में एक संदिग्ध व्यक्ति उनके टिकट चैक कर रहा है और जबरन पैसे वसूली के लिये दबाव डाल रहा है । यह जानकारी मिलने पर वैष्णव ने तुरंत अपने साथियों शेख एवं घाडगे की मदद से इस संदिग्ध व्यक्ति को बिना कोई वक्त गवाएं अपनी सूझबूझ से धर दबोचा तथा इस बात की सूचना कंट्रोल रुम को दी I फर्जी टीटी बने व्यक्ति को  कराड़ स्टेशन पर जीआरपी को सौंप दिया गया तथा उसके खिलाफ प्राथमिकी दर्ज कर कार्रवाई जारी है 

          पुणे रेल मंडल के वरिष्ठ मंडल वाणिज्य प्रबंधक डॉ. मिलिंद हिरवे ने यात्रियों से अनुरोध किया  है कि यात्रा के दौरान किसी भी संदिग्ध व्यक्ति द्वारा टिकट जांच तथा वसूली की सूचना तुरंत वहां पर उपलब्ध रेल कर्मी को देकर अवैध गतिविधियों को रोकने में रेलवे की मदद करें ।  

पुणे: इंदु रानी दुबे ने पुणे मंडल पर मंडल रेल प्रबंधक (डीआरएम) का कार्यभार ग्रहण कर लिया हैं । वह भारतीय रेलवे यातायात सेवा 1994 बैच की अधिकारी हैं। उन्होंने अर्थशास्त्र और कानून में डिग्री हासिल की है । इसके पूर्व वे लखनऊ में चीफ कमिशनर रेलवे सेफ्टी कार्यालय में विशेष कार्य अधिकारी, सेफ्टी/यातायात के रूप में कार्यरत थीं।

 


 दुबे को भारतीय रेल पर विभिन्न पदों पर कार्य करने का गहन अनुभव प्राप्त है । रेल सेवा के दौरान उन्होंने उत्तर पूर्व रेलवे के लखनऊ, इज्जतनगर, वाराणसी, सोनपुर मंडलों तथा उत्तर पूर्व रेलवे के मुख्यालय गोरखपुर में परिचालन एवं वाणिज्य विभाग में विभिन्न पदों पर कार्य किया है।

 

    उन्होंने भारतीय रेलवे के विभिन्न प्रमुख स्टेशन यार्डों की जटिलताओं की जांच करने में योगदान देकर कई जटिल परिचालन और सेफ्टी मुद्दों के व्यावहारिक समाधान प्रदान करने में अपनी विशेष भूमिका निभाई है I उन्हें भारतीय रेलवे के परिचालन में सेफ्टी गतिविधियों में कार्य का गहन अनुभव है । अपनी उत्कृष्ट सेवा के लिए उन्हें वर्ष 2005 में रेल मंत्रालय का राष्ट्रीय पुरस्कार तथा रेलवे सेफ्टी कमिशन में उत्कृष्ट सेवा के लिए वर्ष 2018 में रेल मंत्री द्वारा सम्मानित किया गया है I

 

     उन्होंने जपान में डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर परियोजना से संबंधित कार्य के बारे में  प्रशिक्षण प्राप्त किया है। हाल ही में ऑक्सफोर्ड विश्वविद्यालय से पाठ्यक्रम पूरा करने पर यूनाइटेड किंगडम ब्रिटेन की सरकार ने उन्हें उत्कृष्ट नेतृत्व गुणों के लिए चेवेनिंग गुरुकुल फेलोशिप से सम्मानित किया है I

 

    दुबे ने  पुणे मंडल पर सुरक्षित गाड़ी  संचालन, यात्री सुविधाओं, गाड़ियों की पंक्चुयलिटी को बेहतर बनाने, रेल परियोजनाओं को पूरा करने तथा रेल राजस्व बढाने को अपनी प्राथमिकताओं में रखा है I  उन्होंने कहा कि वह यात्रियों के लिए बेहतर अनुभव उपलब्ध  कराने के लिए हर संभव प्रयास करेंगी जिससे  हमारे माननीय प्रधान मंत्री के राष्ट्र को अधिक गतिशील बनाने के विज़न को पूरा किया जा सके  |

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल अवमानकारक वक्तव्य केल्यामुळे त्यांची राज्याच्या राज्यपाल पदावरून तात्काळ हकालपट्टी करून राजीनामा घ्यावा. अशी मागणी पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष अ‍ॅड.विष्णू तापकीर यांनी केली आहे. 

 


 महाराष्ट्राचं नव्हे तर संपूर्ण देशाचे दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे अ‍ॅड. तापकीर यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू , पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे कडे इमेल द्वारे राज्यपाल कोश्यारी यांचा तात्काळ राजीनामा घेऊन तात्काळ महाराष्ट्रातून हकालपट्टी करावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

  राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्याचा पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष अ‍ॅड.विष्णू तापकीर यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे. तसेच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्ष पाठीशी घालत असून भाजपाचे नेते मंडळी या बाबत काहीही बोलत नसून गप्प का आहेत. या मागचे गौड बंगाल काय आहे असा सवाल अ‍ॅड.तापकीर यांनी केला आहे.-

अष्टांग दर्शनी गीता','विवेकानंद केंद्रातील मंतरलेले दिवस'


पुणे : डॉ.वि.य.कुलकर्णी लिखित अष्टांगदर्शनी गीता आणि दिलीप महाजन लिखित 'विवेकानंद केंद्रातील मंतरलेले दिवस' या पुस्तकांचा प्रकाशन समारंभ विवेकानंद केंद्र कन्याकुमारी, मराठी प्रकाशन विभागाने दि. ३ डिसेंबर रोजी  आयोजित केला आहे.डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ.शरद कुंटे आणि विवेकानंद केंद्र कन्याकुमारीचे महासचिव भानुदास धाक्रस यांच्या हस्ते हे प्रकाशन होणार आहे. हा कार्यक्रम गणेश हॉल,न्यू इंग्लिश स्कुल,टिळक रस्ता येथे ३ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता होणार आहे.



पुणे : आठवीं कक्षा में होने वाली राष्ट्रीय छात्रवृत्ति परीक्षा की तिथि में बदलाव किया गया है। कुछ प्रशासनिक कारणों से यह परीक्षा 18 दिसंबर की जगह 21 दिसंबर को होगी। यह शैक्षणिक वर्ष 2022-23 के लिए आर्थिक रूप से कमजोर वर्ग के छात्रों के लिए राष्ट्रीय छात्रवृत्ति योजना परीक्षा है। राज्य के अधिकांश छात्र इस परीक्षा की तैयारी करते हैं। राष्ट्रीय स्तर पर चयनित होने के बाद छात्र को आगे की शिक्षा के लिए छात्रवृत्ति प्रदान की जाती है।


 

पुणे : लोकजनशक्ती पार्टी रामविलास या पक्षाचा २३ वा स्थापनादिन २८ नोव्हेंबर रोजी साधू वासवानी चौक येथील पक्ष कार्यालयात साजरा करण्यात आला.

 


पक्षाचे पुणे शहर- जिल्हाध्यक्ष संजय आल्हाट यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला.पक्षाचे संस्थापक  रामविलास पासवान यांच्या प्रतिमेला  पुष्पहार अर्पण करण्यात आला.पक्षाच्या शपथपत्राचे सामूहिक वाचन करण्यात आले.प्रदेश सरचिटणीस अमर पुणेकर,के.सी.पवार,संतोष पिल्ले,राहुल उभे,आदिनाथ भाकरे,रणजीत सोनावळे,राजेश पिवाल,बाजीराव पाचरणे,शिवाप्पा राठोड,श्याम पासी,दीपक खुडे उपस्थित होते.महात्मा फुले पुण्यतिथीनिमित्त आदरांजली अर्पण करण्यात आली.

पुणे : महात्मा जोतीराव फुले इतिहास अकादमीच्या वतीने डॉ.मोरेश्वर कोठावदे यांना उल्लेखनीय शैक्षणिक आणि सामाजिक कार्याबद्दल 'महात्मा फुले-सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले.डॉ.कोठावदे हे ए.के.के.न्यू लॉ अकॅडमी(आझम कॅम्पस)येथे कार्यरत आहेत.

 


२८ नोव्हेंबर रोजी बालगंधर्व रंगमंदिर येथे झालेल्या कार्यक्रमात शेतकरी नेते राजू शेट्टी,डॉ.पी.ए.इनामदार,ज्ञानेश महाराव,श्रीमंत कोकाटे,राहुल पोकळे,डॉ.औदुंबर लोंढे,प्रा.सोमनाथ गोडसे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह,प्रशस्तीपत्र देण्यात आले.यावेळी डॉ.सी.टी कुंजीर,डॉ.सारिका बहिरट आदी मान्यवर उपस्थित होते.

पुणे और 15 अन्य प्रमुख शहरों में एक साथ शुरू होगी

 

पुणे: 1971 के युद्ध में पाकिस्तान पर ऐतिहासिक जीत को विजय दिवस के रूप में मनाया जाता है, इस जीत का जश्न मनाने के लिए, सेना के दक्षिणी कमान मुख्यालय ने 16 दिसंबर, 2022 को दक्षिणी स्टार विजय दौड़ -22 का आयोजन किया गया है। दौड़ को दक्षिणी कमान के तहत पुणे और 15 अन्य प्रमुख शहरों में हरी झंडी दिखाई जाएगी। 'रन फॉर सोल्जर्स - रन विद सोल्जर्स' की अवधारणा पर आधारित इस भव्य आयोजन का उद्देश्य भारतीय सेना और लोगों, खासकर युवाओं के बीच के संबंध को मजबूत करना है। शहीदों को श्रद्धांजलि देने के अलावा विजय दौड़-22 के प्रतिभागी हमारे देश के साहस, क्षमता और जज्बे का परिचय देंगे। देश की सेवा में सर्वोच्च बलिदान देने वाले वीर जवानों को श्रद्धांजलि देने के लिए इस भव्य दौड़ का आयोजन किया गया है। विभिन्न स्थानों अर्थात पुणे, सिकंदराबाद, चेन्नई, बैंगलोर, जोधपुर, जैसलमेर और अन्य प्रमुख शहरों में एक साथ आयोजित होने वाले इस कार्यक्रम में हिस्सा लेने के लिए सभी क्षेत्रों के लोगों को आमंत्रित किया गया है। इस समारोह में शहीदों को पुष्पांजलि अर्पित करने का कार्यक्रम होगा और उसके बाद सभी चयनित स्थानों पर विजय दौड़-22 को हरी झंडी दिखाकर रवाना किया जाएगा।

 


विजय दौड़ 22 की शुरुआत 16 दिसंबर 2022 को पुणे में होगी। दक्षिणी कमान के जनरल ऑफिसर कमांडिंग इन चीफ लेफ्टिनेंट जनरल ए.के. सिंह (विशेष सेवा पदक, युद्ध सेवा पदक, सेवा पदक, विशेष सेवा पदक) सुबह सात बजे दक्षिणी कमान युद्ध स्मारक पर माल्यार्पण करेंगे। उसके बाद विजय दौड़ 2022 को पुणे में हरी झंडी दिखाई जाएगी। स्कूल और कॉलेज के छात्रों से लेकर भारतीय सेना ने समाज के हर तबके के नागरिकों से अपनी भागीदारी दर्ज कराने की अपील की है। सेना ने राष्ट्रीय छात्र सेना कैडेटों और अन्य सभी से विजय दौड़ 2022 में हिस्सा लेने और विजय दिवस 2022 विजय समारोह का हिस्सा बनने की अपील की है।

 

विजय दौड़- 22  को 3 श्रेणियों में आयोजित की जाएगी, जिसमें से पुरुषों और महिलाओं के लिए अलग-अलग 12.5 किमी दौड़, स्कूली छात्रों के लिए 5 किमी और केवल महिलाओं के लिए 4 किमी दौड़ होगी। 12.5 किमी वर्ग के लिए कुल पुरस्कार राशि 50 हजार रुपये और स्कूली छात्र व महिला वर्ग के लिए 22-22 हजार रुपये होगी।

 

पुणे में दौड़ में हिस्सा लेने के लिए नि:शुल्क ऑनलाइन पंजीकरण वेबसाइट www.runbuddies.club पर किया जा सकता है। रजिस्ट्रेशन की आखिरी तारीख 10 दिसंबर 2022 है। सदर्न स्टार विजय दौड़-22 में सभी नागरिकों की हार्दिक और उत्साहपूर्ण भागीदारी राष्ट्र निर्माण के प्रति उनके देशभक्ति के जज्बे और प्रतिबद्धता को दर्शाएगी।

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : संविधाना बाबत नागरिकांत जनजागृती करण्यासह भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा तसेच विचारांचा प्रचार, प्रसार सर्वत्र होण्यासाठी त्यांच्या कार्याची आठवण म्हणून, त्यांच्या विचारांचा प्रसार करण्याच्या हेतूने आळंदीत २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्यात आला.
  युवक तरुण, नागरिक, शालेय मुले यांच्या मध्ये संविधानाची मूल्य रुजविण्या करता हा दिवस साजरा संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. आळंदीत विविध सेवाभावी संस्थानच्या वतीने उपस्थितांनी संविधान प्रास्ताविकाचे सामूहिक वाचन केले. प्रास्ताविकाचे नागरिकांना माहितीसाठी तसेच विविध ठिकाणी संविधान दिना निमित्त संविधान प्रास्ताविकाचे सामूहिक वाचनासाठी संविधान प्रास्ताविक पत्रक उपलब्द्ध करून देऊन वाटप करण्यात आले.

 



   आळंदीतील संत ज्ञानेश्वर ऑटोरिक्षा संघटना, टपरी पथारी पंचायत अंतर्गत माऊली भाजी मंडईसह परिसरातील व्यावसायिक, विक्रेते, नागरिक यांना संविधान पत्रकांचे वाटप करून वाटप करण्यात आले. क्रांती पार्क स्मारक जवळ देखील संविधान वाचन करून जनजागृती करण्यात आली. आळंदी जनहित फाउंडेशन कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर, भाईचारा सोशालिस्ट फाउंडेशन सुलतान शेख यांचे वतीने सामूहिक वाचनासाठी संविधान प्रास्ताविक पत्रकांचे वाटप विविध ठिकाणी करण्यात आले.


   २६ नोव्हेंबर २००८ मध्ये मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात १६६ नागरिक आणि मुंबई पोलीस दलातील काही अधिकाऱ्यांना वीरमरण आले होते. या हल्ल्यातील शहिदांना आळंदीत अभिवादन करून आदरांजली अर्पण करण्यात आली.


50 देशातील युवकांनी नोंदवला सहभाग 

पुणे : भारतीय संविधान दिनानिमित्त आयोजित संविधान सन्मान दौड मध्ये स्पर्धकांचा उत्स्फूर्त सहभाग नोंदवला ,स्पर्धेला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी झेंडा दाखवून प्रारंभ केला .सुरुवातील संविधान उदेशिकेचे उपस्थित समुदयाने सामूहिक वाचन करून सुरुवात केली .या स्पर्धेला 50 देशातील युवक सहभागी झाले होते .पुण्यासह राज्यातील नागरिकांनी उस्फुर्त सहभाग नोंदवला .


 

डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती,पुणे डॉ,बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे ,डॉ. बाबासाहेब आंबेडकर विभाग सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि पुणे जिल्हा हौशी अथलेटिक्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय संविधान दिनानिमित्त संविधान सन्मान दौड २०२२ चे आयोजनसावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाच्या प्रांगणात  करण्यात आले होते.या दौडमध्ये दहा किमी, पाच किमी, तीन किमी आणि दिव्यांगांसाठी दोन किलोमीटर व्हीलचेअर रेसचे आयोजन आयोजकांकडून करण्यात आले होते.पहाटे साडेपाच वाजता महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण व संसदीय कार्यमंत्री ना.मा.चंद्रकांत दादा पाटील यांच्या शुभहस्ते दौडला झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला याप्रसंगी बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये,डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टडीज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रमुख डॉ.विजय खरे,डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती पुणेचे अध्यक्ष परशुराम वाडेकर,पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख ,पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, माजी समाज कल्याण राज्यमंत्री अविनाश महातेकर ,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कारभारी काळे आदी उपस्थित होते।


 

 तीन किलोमीटरच्या दौडमध्ये मुलांमध्ये अनुक्रमे प्रथम द्वितीय आणि तृतीय असे क्रमांक लक्ष अकॅडमीच्या प्रदीप माने, पुणे थलेटिक्स क्लबचा पवन जाधव, माने स्पोर्ट्स अकॅडमी चा अनिल जाधव आणि तीन किलोमीटर मुलींमध्ये आदिती हरगुडे,वेदिका साळुंखे ,विशाखा शिंदे ,पाच किलोमीटर प्रकारात मुलांमध्ये धुळदेव घागरे ,माणिक वाघ ,भगीरथ पवार तर मुलींमध्ये प्राची राणे,प्रांजली करांडे, तनवी डोंबे ,दहा किलोमीटर प्रकारात मुलांमध्ये निरज यादव ,दयानंद चौधरी ,बाळू पुकळे तर मुलींमध्ये सपना चौधरी, सानिका नलावडे, ऋतुजा माळवदकर यांनी अनुक्रमे प्रथम द्वितीय व तृतीय अशी बक्षिसे मिळवली. दिव्यांगांच्या दोन किलोमीटर व्हीलचेअर रेस मध्ये खडकी दिव्यांग रिहाबिलिटेशन सेंटरचे दिव्यांग जवान सहभागी झाले होते.

शुभारंभ प्रसंगी प्रस्तावनेमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीचे अध्यक्ष परशुराम वाडेकर यांनी "भारतीय संविधान म्हणजे भारतीय संघराज्याला मिळालेला अमूल्य ठेवा असून संविधान दिनानिमित्त शासकीय सुट्टी जाहीर करावी", असे आवाहन केले.या प्रसंगी बोलताना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी सवैधानिक मूल्यांचे जतन करणे काळाची गरज असून भारताला एकसंघ ठेवण्यामध्ये भारतीय संविधानाचा मोठा वाटा आहे असे प्रतिपादन केले.

 

sunil

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget